कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या लहानशा शहरातून गेली १०१ वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होत असलेल वैनतेय' हे समाजवादी, पुरोगामी विचारधारेच एक प्रमुख साप्ताहिक. आद्य संस्थापक कै. में. द. शिरोडकर यांनी २९ ऑक्टोबर १९२४ रोजी श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या सावंतवाडी संस्थान राज्याधिकार ग्रहण सोहोळयाच्या सुमुहूर्तावर वैनतेयची मुहूर्तमेढ रोवली. कोकणविकास, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींची प्रामाणिक आणि परखड चिकित्सा आणि लोकशाही मूल्यांची पाठराखण करणाऱ्या या नियतकालिकाला ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर, गांधीवादी विचारवंत संपादक मे. द. शिरोडकर, समाजवादी नेते जयानंद मठकर अशी समृद्ध परंपरा आहे. वैनतेयचे सध्याचे संपादक श्री प्रवीण बांदेकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रतिथयश लेखक आहेत. वैनतेयचे माजी संपादक कै. जयानंद मठकर यांनी वैनतेयची धुरा सतत ५५ वर्ष सांभाळली. वैनतेयने शंभरी पुरी करावी हे त्यांच स्वप्न २०१६ साली त्यांच्या निधनानंतर अधुर राहिल की काय अशी शंका होती. पण त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि कुटुंबियांच्या प्रयत्नांमुळे ते साकार झाल आणि आज वैनतेयची १०१ व्या वर्षातील वाटचाल सुरू आहे.
कोकणातल्या लहानशा शहरातून साप्ताहिक चालविण आर्थिक दृष्ट्या किफायतशीर नसलं, तरी मे. द. शिरोडकर आणि जयानंद मठकर यांचा हा ऐतिहासिक वारसा पुढे नेण्याचा हा आमचा प्रयत्न.